ठाणे - गुजरात राज्यातून गांजा तस्करी करणाऱ्या तस्कराला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी शंभर किलो गांजासह अटक केली आहे. विजय पटेल असे या गांजा तस्कराचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी देखील जप्त केली आहे.
100 किलो गांजा जप्त, एकाला अटक - Kalyan Crime News
गुजरात राज्यातून गांजा तस्करी करणाऱ्या तस्कराला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी शंभर किलो गांजासह अटक केली आहे. विजय पटेल असे या गांजा तस्कराचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी देखील जप्त केली आहे.
गांजा तस्करीचे गुजरात कनेक्शन
गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यात गांजा तस्करी होत असल्याचे अनेक वेळा पोलिसांच्या छापेमारी दरम्यान उघडकीस आले आहे. त्यातच कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनाही एक गांजा तस्कर गुजरातहून कल्याणात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी विजय पटेल याला ताब्यात घेतले, त्याच्या कारची झडती घेतली असता त्याच्याकडे शंभर किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत सुमारे 14 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याने हा गांजा कुठून आणला? कोणाला विकणार होता, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.