ठाणे - हेल्पर म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराचा लिफ्ट ट्रॉलीमध्ये माल लोड करताना तिसऱ्या मजल्यावरून तोल गेल्याने खाली पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मानपाडा विकासनाका परिसरातील नवजीवन डाईंग कंपनीत ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ओमकार गुप्ता (३६)असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मनमाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मृत ओमकार हा कंपनीत सोमवारी तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट ट्रॉलीमध्ये माल लोड करत होता. हे काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला. यावेळी ही घटना कंपनीतील सीसीव्हीटीत कैद झाली होती. तर तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने ओमकार गंभीर स्वरूपात जखमी झाला होता. त्याला इतर कामगारांनी मिळून नजिकच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.