महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीतील शेतकऱ्याने खरेदी केले 30 कोटींचे हेलिकॉप्टर - भिवंडी लेटेस्ट न्यूज

हौसेला मोल नसते या म्हणीचा प्रत्यय भिवंडी तालुक्यातील वडपे या गावामध्ये आला आहे. या गावतील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. हा संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

भिवंडीतील शेतकऱ्याने खरेदी केले हेलिकॉप्टर
भिवंडीतील शेतकऱ्याने खरेदी केले हेलिकॉप्टर

By

Published : Feb 14, 2021, 7:21 PM IST

Updated : Feb 14, 2021, 8:47 PM IST

ठाणे- हौसेला मोल नसते या म्हणीचा प्रत्यय भिवंडी तालुक्यातील वडपे या गावामध्ये आला आहे. या गावतील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. हा संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे हेलिकॉप्टर घेणारा हा शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवयाय करतो.

गोदाम व्यवसायामुळे शेतकरी मालामाल

भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने या भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या हाती आर्थिक सुबत्ता आल्याने मर्सिडीझ, फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यु, रेंजरोव्हर, एमजी हेक्टर कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात. एवढेच नव्हे तर काही वर्षांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडील्याक ही कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमानही भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर येथील अरुण आर पाटील या आगरी समाजातील उद्योजकाने मिळवला आहे.

भिवंडीतील शेतकऱ्याने खरेदी केले हेलिकॉप्टर

दुग्ध व्यवसायासाठी इतर राज्यात नेहमी येणेजाणे

घरी गाडी, बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनवले, तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसाया निमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले असून, त्यांना दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागात नेहमी जावे लागते त्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर खरेदी केले आहे.

अडीच एकर जागेत उभारणार हेलिपॅड

भोईर हे आपल्या हेलिकॉप्टरसाठी तब्बल अडीच एकर जागेवर हेलिपॅड उभारणार आहेत. यामध्ये संरक्षक भिंत, हेलिपॅड, हेलिकॉप्टरसाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. आज गावात उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये जनार्दन भोईर यांनी स्वतः न बसता नुकताच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांना फेरफटका मारून आणला हे विशेष.

Last Updated : Feb 14, 2021, 8:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details