ठाणे -अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने केलेल्या तयारीचा आढ़ावा घेण्यासाठी आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्कालीन कक्षाला भेट देवून शहरातील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला तसेच महापालिकेने आपत्कालीन काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या समवेत महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी आवश्यक दूरध्वनी तसेच वायरलेस सेवा सुरळीपणे चालू आहे. याबाबत स्वतः यंत्रणेबाबत खातरजमा करुन घेतली. तसेच कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत की नाही, याची खातरजमा करुन पावसाळ्यात आपत्ती उद्भवल्यास त्या आपत्तीस तोंड़ देण्यासाठी महापालिका सक्षम असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
ठाणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पावसाळी परिस्थितीचा आढावा
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने केलेल्या तयारीचा आढ़ावा घेण्यासाठी आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्कालीन कक्षाला भेट देवून शहरातील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला तसेच महापालिकेने आपत्कालीन काळात केलेल्या कामाचे कौतुक केले.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष अहोरात्र सुरू -
या भेटीच्या वेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आपत्कालीन कक्षाद्वारे करण्यात येणाऱ्या विविध कार्यवाहींबद्दल सविस्तर माहिती दिली. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेचा आपत्कालीन कक्ष सुयोग्यप्रकारे पावसाळा हाताळेल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री - १८०० २२२ १०८ व हेल्पलाईन - ०२२ २५३७१०१० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.