ठाणे - भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे भिवंडी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून बहुतांश घरांमध्ये व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांचे हाल होत आहे.
मुसळधार पावसामुळे भिवंडीतील सखल भाग जलमय; दुकाने, घरांमध्ये शिरले पाणी - Varna
शुक्रवारी सायंकाळपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तर नाले सफाई न झाल्याने त्यातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे. शहरातील निजामपुरा, कनेरी, कमला होटेल, नारपोली, पद्मा नगर, तीन बत्ती, शिवाजी नगर, भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे हाल झाले आहे.
काल सायंकाळपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तर नाले सफाई न झाल्याने त्यातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे. शहरातील निजामपुरा, कनेरी, कमला होटेल , नारपोली, पद्मा नगर, तीन बत्ती, शिवाजी नगर, भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे हाल झाले आहे. पावसामुळे निजामपुरा पोलीस चौकीत देखील पाणी शिरले. तर पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजूर फाटा- रांजनोली बायपास नाका, वंजारपट्टी नाका, नारपोली अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
तर मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहने संथ गतीने जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वारणा, कामवारी, तानसा या नद्यांना पूर आला असून या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर महानगरपालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी ईदगहा रोड येथील कामवारी नदी काठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांनी दुसरीकडे स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला आहे.