ठाणे -हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. ठाणेकरांना मुसळधार पावसाने दुपारनंतर चांगलेच झोडपले. दिवसभरात ठाण्यात 85.32 मिमी पाऊसाची नोंद ठाणे पालिका आपत्तीव्यवस्थापनाने केलेली आहे. तर आतापर्यंत पडलेला एकूण पावसाची 3 हजार 641.63 मिमी इतकी नोंद आहे. बुधवारी (दि. 23 सप्टें.) ठाण्यात दहा ठिकाणी पाण्याने चक्काजाम केला. तर 3 झाडे पडल्याची नोंद आहे. मुसळधार पावसामुळे दिवसभर वाहतूक संथ गतीने सुरू होती.
ठाणेकरांना मुसळधार पावसाने झोडपले, 85.32 मिमी पावसाची नोंद
ठाण्याला मुसळधार पावसाने धुतले. ठाण्यात दिवसभरात 85.32 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नारपोली हद्दीमध्ये मानकोली ब्रिज खाली पाणी भरले, उल्हास हद्दीमध्ये बँक ऑफ इंडिया च्या समोर आणि स्मशानभूमी, कोळसेवाडी हद्दीमध्ये बदलापूर चौक वैभव नगरी या ठिकाणी पाणी भरले होते. मुंब्रा हद्दीमध्ये शिवले नगर, वाय जंक्शन कल्याण फाटा आणि शिळफाटा या ठिकाणी पाणी भरले होते. लहान वाहनांची वाहतूक थांबवण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
मुसळधार पावसाने ठाण्यात तीन झाडे पडली आणि शातीग्रस्त झाल्याची माहिती आहे. यात आनंदपार्क, राबॉडी येथील अनंत तरे यांच्या बंगळ्याजवल एक झाड, कोपरी पूर्व भागातील मीठ बंदर रोडवर श्री स्वामी समर्थ मठाच्या जवळ एक झाड, तिसरे झाड वागळे इस्टेट येथील गुरुकृपा मोटर्सच्या पुढे एक झाड एका चारचाकीवर पडून कारचे नुकसान झाले.
हेही वाचा -भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या 39 वर, बचावकार्य सुरुच