महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे : जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद; सखल भागात शिरले पाणी

जिल्ह्यात गेल्या 24 तासात  675 मिलिमीटर पावसाची दोन झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक 194 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले असून सरासरीपेक्षा तब्बल सहा हजार मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.

By

Published : Sep 4, 2019, 3:43 PM IST

जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद

ठाणे - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 675 मिलिमीटर पावसाची दोन झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक 194 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल भिवंडी तालुक्यात 160 मिमी, उल्हासनगरमध्ये 104, अंबरनाथमध्ये 101 मिमी आणि कल्याणमध्ये 84 मिमी पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले असून सरासरीपेक्षा तब्बल सहा हजार मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सरासरी 17 हजार 150 मिमी पाऊस पडतो, पण आत्तापर्यंत तब्बल 23 हजार 185 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, या रेकॉर्डब्रेक पावसामुळे कल्याण उल्हासनगर आणि भिवंडी शहरात सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे.परिणामी, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज पहाटेपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details