महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबई, पनवेल अन उरण परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस - नवी मुंबई पाऊस बातमी

नवी मुंबईसह पनवेल, उरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने काढणी सुरू असलेल्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पाऊस
पाऊस

By

Published : Oct 10, 2020, 8:13 PM IST

Updated : Oct 10, 2020, 8:47 PM IST

नवी मुंबई- पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरात जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. खरीप हंगामातील पिके काढण्याची कामे सुरू असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ चित्र उडाल्याचे पाहायला मिळाले. ऐन भात काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई, पनवेल अन उरण परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
आज (दि. 10 ऑक्टोबर) दुपारी नवी मुंबईसह पनवेल उरणमध्ये मेघगर्जनेसह पावासाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पनवेल, नवी मुंबई, उरण विभागात अनेक ठिकाणी भात कापणीसाठी तयार झाले आहे. यावेळी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे भातशेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
Last Updated : Oct 10, 2020, 8:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details