महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईसह पनवेलमध्ये गुरुवारपासून पाऊस... सखल भागात साचले पाणी

महापालिकेचा नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा फोल ठरल्याचे कालच्या पावसातच स्पष्ट झाले आहे. कालपासूनच शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मिलेनियम बिझनेस पार्क, ऐरोली टी जंक्शन, बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केट, शिरवणे भुयारी मार्गासह एकूण आठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

heavy-rain-at-navi-mumbai-and-panvel
नवी मुंबईसह पनवेलमध्ये गुरुवारपासून पाऊस...

By

Published : Jul 4, 2020, 1:21 PM IST

नवी मुंबई- नवी मुंबईसह पनवेलकरांना सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले आहे. शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊसाला सुरुवात झाली होती. हा पाऊस सलग तीसऱ्या दिवशी शनिवारीही सुरू आहे. गेल्या दोन दिवसात दिवसभरात २५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


महापालिकेचा नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा फोल ठरल्याचे कालच्या पावसातच स्पष्ट झाले आहे. कालपासूनच शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मिलेनियम बिझनेस पार्क, ऐरोली टी जंक्शन, बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केट, शिरवणे भुयारी मार्गासह एकूण आठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी दोन फुटांपेक्षा जास्त पाणी भरल्याचे निदर्शनास आले. पावसामुळे बाजार समितीच्या व्यवहारावरही काही प्रमाणात परिणाम झाला. ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

नवी मुंबईसह पनवेलमध्ये गुरुवारपासून पाऊस...


पावसामुळे पनवेल, शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे परिसरामध्ये पाणी साचले आहे. नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. मृतांचा आकडेवारीही दररोज वाढत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात १० दिवसाची टाळेबंदी आजपासून सुरू झाली आहे. एकीकडे शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना त्यात पावसाची भर पडली आहे. दोन दिवसांपासूनच नवी मुंबई व पनवेल शहरात जोरदार पाऊस पडत आहे. काल २५७ नवे कोरोनाचे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ७ हजार ३४५ झाली आहे. पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगांची भीती व दुसरीकडे कोरोनाचे संकट त्यात खाजगी दवाखाने बंद असल्याने नवी मुंबई पनवेलमधील नागरिक चांगलेच कोंडीत सापडले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details