ठाणे - मुरबाड तालुक्यात पावसासह गरांच्या पावसाने अनेक गावांना झोडपून काढले. यात अनेक घरांचे नुकसान झाले. गेल्या दोन-चार दिवस ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर काल संध्याकाळच्या सुमारास पावसाने मुरबाड तालुक्यातील काही भागांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे, वातावरण थोडे अल्हाददायक होऊन गारवा पसरला होता.
हेही वाचा -कल्याणच्या बेपत्ता तरुणीचे गूढ उकलेना; पोलिसही बुचकळ्यात
वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, रोगराईची शक्यता
मुरबाड तालुक्यात वैषखरे, मोहप, टोकावडे परिसरात घरांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले, तर दोन दिवसांपूर्वही अवकाळी पावसाने मोरोशी येथेही अनेक घरांचे नुकसान झाले. शिवाय काल वादळी वाऱ्यासह गरपीट झाल्याने बहुतांश घरांसह शेकडो एकर शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे, मुरबाड तहसीलदार यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर करून द्यावी, अशी मागणी तालुक्यातील गावांतील ग्रामस्थ उद्या करणार असल्याचे समजले.