ठाणे- मुंबईसह ठाण्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी सकाळपासुनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाण्यातील अनेक सखोल भागात साचले पाणी आहे. तसेच डॉ. आंबेडकर मार्गावरील नाला तुडुंब भरला. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहे. शिवाय, ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ठाण्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर - नाला तुडुंब भरला
ठाण्यामध्ये शुक्रवारी सकाळपासुनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाण्यातील अनेक सखोल भागात साचले पाणी आहे. तसेच डॉ. आंबेडकर मार्गावरील नाला तुडुंब भरला. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला.
जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
जोरदार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. पावसामुळे मुंब्रा येथे इमारतीचा भाग कोसळून एक जण जखमी झालेला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वंदना सिनेमा मानपाडा येथील चिरागनगर हिरानंदानी इस्टेट या सखल भागात पाणी साचल्यामुळे लोकांना बाहेर पडता येत नाही आहे.