महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस; पालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला फोल - navi mumbai heavy rain

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत व पनवेल शहरात लॉकडाऊन जाहीर केल्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मात्र कोणाचीही गैरसोय झाली नाही. महापालिकेचा नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा पहिल्याच पावसामध्ये फोल ठरला आहे.

heavy rain fall in navi mumbai
नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस; पालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला फोल

By

Published : Jul 3, 2020, 2:44 PM IST

नवी मुंबई - बऱ्याच दिवसांनी नवी मुंबईत पावसाचे आगमन झाले आहे. नवी मुंबई, पनवेल, उरणसह पनवेलकरांना शुक्रवारी पावसाने झोडपले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पनवेलमधील गावदेवी पाडा परिसरामध्ये घरात पाणी शिरले होते. शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. दिवसभरात १४१ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस; पालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला फोल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत व पनवेल शहरात लॉकडाऊन जाहीर केल्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मात्र कोणाचीही गैरसोय झाली नाही. महापालिकेचा नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा पहिल्याच पावसामध्ये फोल ठरला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मिलेनियम बिझनेस पार्क, ऐरोली टी जंक्शन, बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केट, शिरवणे भुयारी मार्गासह एकूण आठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी दोन फुटांपेक्षा जास्त पाणी भरल्याचे निदर्शनास आले. पावसामुळे बाजार समितीच्या व्यवहारावरही काही प्रमाणात परिणाम झाला. ग्राहकांची संख्या कमी झाली होती.

पावसाने पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. पनवेल, शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे परिसरामध्ये पाणी साचले होते. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. प्रवेशद्वारांवर एक फूटपेक्षा जास्त पाणी साचले होते. मॅफ्कोपासून बाजार समितीपर्यंत ठिकठिकाणी पाणी साचले असल्याची माहिती मिळाली.तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details