ठाणे - खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत ( Rahul Gandhi in Bhiwandi ) वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका ( RSS Defamation Case ) दाखल केली होती. याच याचिकेवर आज जलदगती न्यायालयात सुनावणी ( Bhiwandi fast track court ) होऊन या दाव्याची सुनावणीसाठी पुढील २२ फेब्रुवारीला होणार असल्याचे न्यायाधीश जे व्ही पालीवाल यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना ( 10 February hearing result ) सांगितले.
पुढील सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी -
भिवंडी न्यायालयामध्ये राजेश कुंटे विरुद्ध राहुल गांधी यांची मानहानी बाबत सुनावणी चालू असताना आज तक्रारदारातर्फे ॲड. प्रबोध जयवंत व ॲड गणेश धर्गळकर यांनी फिर्यादीच्यावतीने तहकुबी करिता अर्ज दिला. सदर अर्जामध्ये त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय मुंबई व प्रथमवर्ग न्यायालय भिवंडी यांच्या आदेशाविरुद्ध रिट याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर या दाव्याची सुनावणी घ्यावी असा तहकुबी अर्ज देऊन युक्तिवाद केला. परंतु सदर प्रकरणास स्थगिती आदेश आले नसल्याने हे प्रकरण पुढील तारखेस फिर्यदीचा पुरावा नोंदिण्यासाठी ठेवण्यात आले. तर राहुल गांधी यांच्याकडून ॲड. नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. त्यांनी देखील राहुल गांधी हे गोवा, पंजाब व उत्तरप्रदेश येथे निवडणूक असल्याने ते व्यस्त असल्याने यांचा देखील गैरहजेरीचा अर्ज दिला असता न्यायालयाने अर्ज मजूर केला. दोन्ही पक्षकारांच्या अर्जावरील युक्तिवाद पाहून भिवंडी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश जे.व्ही. पलीवाल यांच्या न्यायालयासमोर सुनावणी होऊन पुढील तारीख २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.