ठाणे - मीरा भाईंदर शहरातील वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी सारथी सामाजिक संस्थेच्या वतीने गोल्डन नेस्ट सर्कल जवळ वैद्यकीय शिबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी १०० पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी यांनी या वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला.
माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत गायकवाड हेही वाचा -मीरा भाईंदरमधून साडेदहा किलो गांजा जप्त, आरोपीला अटक
शिबिरात डोळे, रक्तदाब तपासणी, पोटाचे विकार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात शहरातील वाहतूक चालक, रिक्षा चालक यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. दिवसरात्र रस्त्यावर ड्युटी करणारे पोलीस कर्मचारी यांनी आपली तपासणी केली.
सामाजिक संस्थेची साथ...
मीरा भाईंदर शहरातील अनेक सामाजिक संस्था पोलीस प्रशासनाला खूप चांगले सहकार्य करत आहेत. सारथी संस्थेतर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक सामजिक संस्थांनी सहभाग नोंदवला. शहरातील रिक्षा चालकांसह वाहतूक पोलिसांनी आपली वैद्यकीय तपासणी केली. भविष्यात चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करतील, अशी माहिती मीरा भाईंदर वसई विरार परिमंडळ-१ चे सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा -गेल्या वर्षी कोरोनापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे; वाहतूक उपायुक्तांची माहिती