ठाणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराजावर ( Kalicharan Maharaj Hate Speech Mahatma Gandhi ) अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नौपाडा पोलीस ठाण्यातही कालीचरण महाराजवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार नौपाडा पोलिसांनी कालीचरण महाराजला अटक केली असून, गुरुवारी ठाण्यात आणणार असल्याची ( kalicharan Maharaj Arrest Thane Police ) माहिती सुत्रांनी दिली.
महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिव्या दिल्याप्रकरणी धर्मसंसद वादात सापडली होती. कालीचरण महाराजने या संसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला. कालीचरण महाराजच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला होता. काही ठिकाणी गुन्हेही दाखल केले होते. यापुर्वी वर्धा पोलिसांनी कालीचरण महाराजाला ( Wardha Police Arrest Kalicharan Maharaj ) अटक केली होती.