ठाणे - गुजरातहून भिवंडीत तीन ट्रकमधून आलेला विविध कंपन्यांचा जवळपास ६५ लाख किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला. यामुळे गुजरातहून मुंबईसह ठाणे जिल्ह्यात प्रतिबंधक गुटख्यांची लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने उघड झाले आहे. कारवाईदरम्यान तीन ट्रक जप्त केले आहेत. तसेच दोन चालकांवर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करत त्यांना अटक केली आहे. तर, ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गुजरातहून भिवंडीत आणलेला 65 लाखांचा गुटखा तीन ट्रकसह जप्त; दोघे अटकेत - भिवंडी पोलीस न्यूज
महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस प्रतिबंध आहे. अशात शेजारील गुजरातमधून विविध मार्गे लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला महाराष्ट्रात विक्री केला जात आहे.
महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस प्रतिबंध आहे. अशात शेजारील गुजरातमधून विविध मार्गे लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला महाराष्ट्रात विक्री केला जात आहे. अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त भूषण मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील मार्गावर रात्रभर पाळत ठेवली. यावेळी भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रकमधील 280 गोण्यात असलेला 65 लाख 78 हजार रुपये किंमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा जप्त केला आहे. तसेच तीन ट्रक ताब्यात घेतले आहेत.
या कारवाईन दोन ट्रक चालकांना ताब्यात घेतले असून, अंधाराचा फायदा घेत एक चालक पसार झाला आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुटखा आणि ट्रक असे मिळून एकूण 1 कोटी 1 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुटख्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चालकांविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी पोलीस पुढील तपास करत आहेत.