ठाणे- भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा फटका गुजरात राज्यातील एसटी चालकाला बसला असून एका रिक्षातील प्रवाशाने बसचालकाला मारहाण करून बसची काच फोडली. ही घटना भिवंडीतील अशोकनगर प्रवेशद्वारासमोर घडली आहे. प्रवीण सुरसिंग पारगी (३३ रा.नवागाम, गुजरात ) असे मारहाण झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे.
प्रवीण हा बसचालक भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने शुक्रवारी सायंकाळच्या सुमाराला जात असताना एसटी बस ( केजीजे - १८ झेड - २७६९ ) अशोकनगर येथे आली. त्याच दरम्यान बसच्या पाठीमागून एक भरधाव रिक्षा बसला धडकली. त्यावेळी रिक्षातील प्रवाशी बिलाल अहमद अन्सारी (२३ रा. चव्हाण कॉलनी ) याने एसटीमध्ये चढून चालक प्रवीण याला शिवीगाळ करीत बुक्क्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने धिंगाणा घालत रस्त्यावरील दगड उचलून बसच्या पाठीमागील काचेवर फेकून काच फोडून एसटी बसचे नुकसान केले व प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला.