ठाणे - मराठी नव वर्षाचा पहिला दिवस, साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला आयोजित शोभायात्रांमध्ये यंदा अनेक ठिकाणी पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवलेल्या शौर्याचे पडसाद उमटले होते. कोणी दहशतवादाविरोधात शौर्याची गुढी उभारली होती तर कोणी या हवाई प्रत्युत्तराची चित्ररथामध्ये प्रतिकृती साकारली होती. यंदाच्या शोभायात्रांमध्ये त्यामुळे संस्कृती आणि शौर्य यांचा अनोखा मिलाफ दिसला.
ठाण्यात गुडीपाडवा जल्लोषात साजरा, लहानगे महिलांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग - Than
गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन घडवले जाते. यंदाही ठाण्यातील घोडबंदर परिसरात पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. बालगोपाळांनी विठ्ठल- रखुमाई यांच्या गाण्यावर थिरकून एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला.
ठाण्यात गुडीपाडवा जल्लोषात साजरा, लहानगे महिलांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग
गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन घडवले जाते. यंदाही ठाण्यातील घोडबंदर परिसरात पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. बालगोपाळांनी विठ्ठल- रखुमाई यांच्या गाण्यावर थिरकून एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. तसेच या परिसरातील महिलांनी देखिल गणरायाच्या गाण्याने शोभायात्रेला दिमाखात सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात अवघी ठाणे नगरी दुमदुमली.