ठाणे - देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्र याबाबतीत देखील आघाडीवर असल्याचे दिसत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन इतर विभागांच्या मदतीने भरीव कामगिरी करत आहेत. जीवावर उदार होऊन पोलीस बांधव आणि भगिनी आपले कार्य करत आहेत. त्यामुळे ते करत असलेल्या उल्लेखनीय कार्याला सर्वांनी मानाचा मुजरा दिला आहे.
पालकमंत्री कोरोना योद्ध्यांच्या मदतीला, पोलिसांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोरोना विषाणूचे संकट, त्यातून कुटुंबाचा प्रमुख कोरोना योद्धा म्हणून रस्त्यावर लढतोय. तसेच तुटपुंज्या पगारात घर चालवणे या समस्यांना तोंड देणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा प्रवास मी नक्कीच जाणतो. म्हणूनच त्यांचा पालक या नात्याने कृतज्ञता व्यक्त करत त्यांना मदतीचा हात पुढे केलाय, पोलीस रस्त्यावर उभे राहून बंदोबस्त करत असतानाच त्यांच्या घरी जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याचे काम ठाण्यातील शिवसेनेच्या वतीने केले जात असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पोलिसांच्या याच कार्याला सलाम करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासोबत पोलिसांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. कोरोनाच्या काळात त्याचा प्रादुर्भाव रोखला जावा, यासाठी पोलीस रस्त्यावर उभे राहून बंदोबस्त करत असतानाच त्यांच्या घरी जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचं काम ठाण्यातील शिवसेनेच्या वतीने केलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्री शिंदे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते ठाण्यातील पोलीस वसाहतीमध्ये पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचे संकट, त्यातून कुटुंबाचा प्रमुख कोरोना योद्धा म्हणून रस्त्यावर लढतोय. तसेच तुटपुंज्या पगारात घर चालवणे या समस्यांना तोंड देणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा प्रवास मी नक्कीच जाणतो. म्हणूनच त्यांचा पालक या नात्याने कृतज्ञता व्यक्त करत त्यांना मदतीचा हात पुढे केलाय, अशी भावना यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली. पोलीस वसाहतीत शिवसेनेच्या माध्यमातून सुधीर कोकाटे, हेमंत पवार, निखिल बुडजडे, कमलेश चव्हाण, जॅकी भोईर यांच्यामार्फत मदत पोहोचवली जात आहे.