महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

TB Patients Thane : ठाण्यात टीबीच्या रुग्णांची परवड सुरुच; पोषण आहाराची रक्कमही रखडली ..

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत क्षयरोग म्हणजे टीबी आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली असतानाच, ( TB Patients Increasing in Thane ) गेल्या डिसेंबर महिन्यापासून त्यांना औषधे पुरवणाऱ्या जीटीटीई ( GTTE TB Patients Thane ) या केंद्र सरकारने नेमलेल्या संस्थेचे काम अचानक बंद केले. त्यामुळे टीबीच्या रुग्णांची परवड सुरू आहे.

By

Published : Feb 13, 2022, 12:20 PM IST

Updated : Feb 13, 2022, 1:42 PM IST

GTTE stopped their work for TB Patients Thane
ठाण्यात टीबीच्या रुग्णांची परवड सुरुच

ठाणे - कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत क्षयरोग म्हणजे टीबी आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली असतानाच, ( TB Patients Increasing in Thane ) गेल्या डिसेंबर महिन्यापासून त्यांना औषधे पुरवणाऱ्या जीटीटीई ( GTTE TB Patients Thane ) या केंद्र सरकारने नेमलेल्या संस्थेचे काम अचानक बंद केले. त्यामुळे टीबीच्या रुग्णांची परवड सुरू आहे. या रुग्णांना केंद्र सरकारकडून मिळणारा पोषण आहाराची रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा झाली नसल्याने हजारो रुग्ण पोषण आहार भत्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे टीबी निर्मूलन यंत्रणा करते काय? असा सवाल रुग्णांनी उपस्थित केला आहे. तर संबधित आरोग्य विभागाच्या मते लवकरच त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले.

महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील याबाबत बोलताना

कोरोनाच्या काळात रुग्ण संख्येत वाढ -

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत टीबीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे वैद्यकीय सेवा न घेतलेल्या टीबीचे रुग्णांनी आता पुन्हा रुग्णालयात येण्यास सुरुवात केली आहे. २०२०मधील रुग्णांच्या तुलनेत त्यांची संख्या २०२१ मध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही रुग्णसंख्या अजून वाढेल, अशी भीती खासगी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र, करोना संसर्गाच्या काळामध्ये ज्या प्रमाणात रुग्णांना लागण होण्याची शक्यता होती. त्या प्रमाणात रुग्णांना संसर्ग झाला नसल्याचेही सांगण्यात आले. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २०२० मध्ये खासगी व शासकीय रुग्णालयात २ हजार ७९० रुग्ण आढळून आले. तर २०२१साली रुग्ण संख्येत वाढ होऊन खासगी व शासकीय रुग्णालयात ३ हजार ३५९ असे एकूण ६ हजार १४९ रुग्ण कोरोनाच्या कालावधीत टीबीचे रुग्ण आढळून आले.

हेही वाचा -Deprived of Basic Amenities : आम्हालाही जगण्याचा अधिकार, ठाण्यातील आदिवासी पाड्यांमधील नागरिकांची आर्त

रुग्णांचे पोषण आहार रखडले -

टीबीच्या रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा, यासाठी केंद्र सरकारच्या क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिना पोषण आहार भत्ता म्हणून ५०० रुपये दिले जातात. मात्र, अनेक रुग्णांच्या बँक खाते क्रमांक देऊनही त्यांच्या खात्यात भत्ताची रक्कम मिळाली नसल्याचे समोर आले. दोन वर्षांच्या कालावधीतील ६ हजार १४९ रुग्णांच्या संख्यापैकी ३५ लाख ५१ हजार रुपये रुग्णांच्या बँक खात्यात जमा झाले. एकंदरीत पाहता केवळ ३० टक्क्यांच्या जवळपास रुग्णांच्या खात्यात रक्कम जमा झाली. मात्र, ७० टक्के रुग्ण आजही पोषण आहार भत्त्यापासून वंचित असल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे टीबी नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत पूर्वी एकाच बँक खात्यात रक्कम जमा होत होती. मात्र, सर्वच बँक खाते वेगवेगळी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने वेळ लागत असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली. यामुळे टीबीच्या रुग्णांचे पोषण तांत्रिक बाबींमुळे रखडले आहेत.

रुग्णांपर्यंत मदत पोहोचत नसल्याचे चित्र -

सरकारच्या नवीन निर्णयामुळे व तांत्रिक बाबींमुळे टीबीच्या रुग्णांपर्यंत मदत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी महापालिकेच्या शासकीय रुग्णालयाला एकदा भेट देऊन आपली नोंद करून मोफत औषधे मिळू शकतील. तसेच पुढील वेळेस औषधे त्यांच्या घरपोच केल्या जातील, अशी माहितीही महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.

Last Updated : Feb 13, 2022, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details