ठाणे-कल्याण पूर्वेतील एका इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थांना फी साठी तगादा लावला होता. शाळेतील फी अव्वाच्या-सव्वा असल्याने पालकांनी फीमध्ये सवलत देण्याची मागणी केली. मात्र शाळा प्रशासनाने नकार दिल्याने पालकांनी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे धाव घेतली. त्यांनतर नगरसेवक गायकवाड यांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन मध्यस्थी केल्याने पालकांना शैक्षणिक फीमध्ये दिलासा मिळाला आहे.
नगरसेवकाच्या मध्यस्थीने इंग्लिश स्कूलमधील पालकांना शैक्षणिक 'फी'मध्ये मोठा दिलासा - educational update thane
कल्याण पूर्वेतील एका इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थांना फीसाठी तगादा लावला होता. शाळेतील फी अव्वाच्या-सव्वा असल्याने पालकांनी फीमध्ये सवलत देण्याची मागणी केली. मात्र शाळा प्रशासनाने नकार दिल्याने पालकांनी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे धाव घेतली.
कोरोना महामारीमुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीपासून सर्वच नागरिक त्रस्त आहेत. अनेक खासगी नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या. तर रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या हाताला काम उरले नाही. पण, दैनंदिन गरजा रोज आ वासून उभ्या आहेत. या अडचणीत खासगी शाळा मुलांच्या शैक्षणिक फिसाठी पालकांकडे तगादा लावत आहेत.
कल्याण पूर्वेडील साई इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे फी माफीसाठी मदत मागीतली. दरम्यान महेश गायकवाड यांनी चर्चा करून वार्षिक फीमध्ये ३५% एवढी सूट मिळवून दिली. ही सवलत मिळाल्याने सर्व पालक वर्गाने नगरसेवक महेश गायकवाड यांचे आभार मानले. तसेच शाळा प्रशासनाने सर्व बाजू नीट ऐकून पालकांच्या व्यथा ऐकून ३५%फी माफीचा निर्णय घेतला.