ठाणे -भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महिला सरपंचासह सदस्यांशी वाद घालणाऱ्या विरोधात सर्व पक्षीय एकत्र येत गावकऱ्यांनी निषेध सभेचे आयोजन केले. यावेळी सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांनी शुल्लक कारणावरून कायदा व सुवेस्थाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या विरोधकांचा निषेध सभेत साडे चार वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत समाचार घेतला.
ग्रामसभेत महिला सरपंचासह सदस्यांशी वाद घालणाऱ्याविरोधात 'निषेध सभा'
काही काळ ग्रामसभेत तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्या तरुणांविरोधात विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तर दुसरीकडे याघटनेमुळे सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हनुमान मंदिर समोर शेकडोच्या संख्येने एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यासाठी सभा आयोजित केली.
सरपंच बोलताना
Last Updated : Mar 30, 2022, 8:34 PM IST