ठाणे- शासकीय सेवेत 2005 पासून रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बंद करण्यात आल्याने त्यांना निवृत्ती वेतन मिळणार नाही. त्यामुळे वृद्धपकाळात अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी जुनी पेन्शन ( Old Pension ) सुरू करा, या मागणीसाठी जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने पडघा ते विधानभवन ( Vidhan Bhavan), असा पायी मोर्चा ( Government Employees March ) काढण्यात आला आहे. यात राज्यातील 36 जिल्ह्यांतील हजारो शासकीय कर्मचारी सामील झाले आहेत.
Old Pension : जुनी पेन्शन लागू करा, या मगाणीसाठी हजारो शासकीय कर्मचारी धडकणार विधान भवनावर - Marathi News Winter Session 2021
जुनी पेन्शन ( Old Pension ) लागू करा, या एकमेव मागणीसाठी पडघा येथून तीन दिवसांपासून पायी चालत निघालेला मोर्चा आज ( गुरुवार ) ठाण्यात दाखल झाला. मुलुंड येथे मुंबईच्या वेशीवर हा मोर्चा आज मुक्काम करणार आहे आणि उद्या तो थेट विधानभवनावर (Vidhan Bhavan) धडकणार आहे. मागणी मान्य झाली नाही तर शासकीय कार्यालयांतील कामकाज बंद पाडू, असा इशारा देण्यात आला आहे.
जुनी पेन्शन लागू करा, या एकमेव मागणीसाठी पडघा येथून तीन दिवसांपासून पायी चालत निघालेला मोर्चा आज ( गुरुवार ) ठाण्यात दाखल झाला. मुलुंड येथे मुंबईच्या वेशीवर हा मोर्चा आज मुक्काम करणार आहे आणि उद्या तो थेट विधानभवनावर ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) धडकणार आहे. तीन दिवस चालून आमचे पाय दुखले. मात्र, आमची मागणी राज्य सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारने अजूनही आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला नाही. सरकारने आमची मागणी पूर्ण केली नाही तर लाखो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विधान भवनाबाहेर ठिय्या करू. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कामकाज बंद पाडू, असा इशारा जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
हे ही वाचा -Meera Bhynder Crime : आमदार गीता जैन यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक