महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपुन के भाई का बर्थडे है, पोलिस व्हॅनमध्ये गुंडाने केक कापून केला वाढदिवस साजरा - Goon Roshan Zha cake cutting in police van

एका हत्येच्या प्रकरणात कारागृहात असलेल्या रोशन झा या उल्हासनगर मधील गुंडाचा पोलिसांच्या व्हॅनमध्ये केक कापून वाढदिवस साजरा Thane Goon Birthday Celebration करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल Thane Goon birthday celebration viral video झाला आहे. हाच व्हिडिओ त्याच्या समर्थकांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Goon Roshan Zha cake cutting in police van
गुंड रोशन झा चा वाढदिवस साजरा करताना

By

Published : Aug 21, 2022, 8:23 PM IST

Updated : Aug 21, 2022, 10:13 PM IST

ठाणे एका हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आधारवाडी कारागृहात असलेल्या रोशन झा या उल्हासनगर मधील नामचीन गुंडाचा पोलिसांच्या व्हॅनमध्ये केक कापून वाढदिवस साजरा Thane Goon Birthday Celebration करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला Thane Goon birthday celebration viral video असून हाच व्हिडिओ त्याच्या समर्थकांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे ठाणे ग्रामीणचे एसपी विक्रम देशमाने Thane Gramin Police SP Vikram Deshmane यांनी या घटेनच्या चौकशीचे आदेश दिल्याने पोलीस व्हॅनवर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची action against Thane Police टांगती तलवार लटकली आहे.

गुंड रोशन झा पोलिसांच्या व्हॅनमध्ये वाढदिवस साजरा करतानाचा व्हायरल व्हिडिओ


गुंड रोशन झावर 7 गंभीर गुन्हेरोशन झा हा उल्हासनगरमधील नामचीन गुंड असून तो उल्हासनगर नजीक म्हारळ गावात राहणार आहे. त्याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात , हत्येचा प्रयत्न,खंडणी, धमकवणे आणि इतर 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास या गुंडाला कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यात हद्दीत दीड वर्षांपूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा शनिवारी दुपारच्या सुमारास आधारवाडी कारागृहातून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात ठाणे ग्रामीण पोलीस पथकाने व्हॅनमधून आणले होते. यावेळी पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेल्या गुंड रोशन झा यांने खिडकीमधून समर्थकांनी आणलेला केक कापला. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. दुसरीकडे ठाणे ग्रामीणचे एसपी विक्रम देशमाने यांनी या घटेनच्या चौकशीचे आदेश दिले आहे. पोलीस व्हॅनवर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे.

ग्रामीणचे अधीक्षक विक्रम देशमाने यांचे चौकशीचे आदेशदरम्यान पोलिसांच्या व्हॅनमध्ये हा गुंड त्याचा वाढदिवस कसा काय साजरा करू शकतो असा सवाल उपस्थित झाला आहे. दुसरीकडे पोलिसांच्या व्हॅनमध्ये असताना देखील हा गुंड केक कापत होता. मात्र त्याला पोलिसांनी मज्जाव का केला नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ठाणे जिल्हा ग्रामीणचे अधीक्षक विक्रम देशमाने यांनी या व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. यामुळे पोलीस व्हॅनवर कार्यरत पोलीस कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचामुंबई महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघांची सहा लाखांने फसवणूक

Last Updated : Aug 21, 2022, 10:13 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details