नवी मुंबई-वाशी रेल्वे स्थानकात 55 वर्षीय महिलेची सोनसाखळी गळ्यातून खेचून पोबारा करणाऱ्या चोरट्याला वाशी रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
वर्षीय महिलेचा पाठलाग करून वाशी रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हेही वाचा -राज्य सरकारने न्यायालयात योग्य भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय द्यावा - खासदार संभाजीराजे
महिलेचा आरडाओरडा ऐकून प्रवाशांनी पकडले चोरट्यास
कुर्ला येथून वाशी रेल्वे स्थानकात सबवेतून घणसोलीला गाडी पकडण्यासाठी ही महिला जात होती. वाशी स्थानकातील पायऱ्या चढत असताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन आरोपी पळ काढत होता. महिलेचा आरडाओरडा ऐकून यावेळी रेल्वे स्थानकात असलेल्या प्रवाशांनी पकडून चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिला राम मार्कही सनही (25 वर्षे) हा चोरटा मानखुर्द येथे राहण्यास असून तो बिगारी काम करीत होता. त्याच्याकडे काम नसल्याने साध्या तो बेरोजगार असून पैसे कमवण्यासाठी त्याने चोरीच्या शॉर्टकर्ट मार्गाचा अवलंब केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा -अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
हेही वाचा -हिरेन मृत्यू प्रकरणी गृहमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्यात बैठक