ठाणे -'गॉड्स व्हॉलेंटीयर' या सामाजिक संस्थेने शहापूर तालुक्यातील आदिवसी आश्रम शाळेला मदतीचा हात दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी एका महिन्याचे अन्नधान्य, मुलींसाठी २ सॅनिटरी पॅड इन्सिनेटर मशीन, दिवाळीचे फराळ हे साहित्य देण्यात आले. सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी आदिवासी मुलांसह दिवाळी साजरी केली.
'गॉड्स व्हॉलेंटीयर' या सामाजिक संस्थेने शहापूर तालुक्यातील आदिवसी आश्रम शाळेला मदतीचा हात दिला
मुंबईच्या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या बिजल जगड, विशाल गाडा यांच्या 'गॉड्स व्हॉलेंटीयर' या सामाजिक संस्थेमार्फत शहापूर तालुक्यातील डोळखांब भागातील शाळेला ही मदत करण्यात आली.
हेही वाचा - भाजपचे संकल्पपत्र म्हणजे गाजरांचा पाऊस; सुप्रिया सुळेंचा निशाणा
मागील ५ ते ६ वर्षांपासून दुर्गम भागातील आदिवसी मुलामुलींसाठी ही संस्था मदतीचा हात देण्याचे कार्य करते आहे. ही सामाजिक संस्था पालघर आणि सुरतच्या धनु, धर्मपूर, वलसाड या भागातील आदिवासी लोकांसाठी कार्यरत आहे. आजपर्यंत अनेक विनाअनुदानित आदिवासी आश्रम शाळांमध्ये विविध साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत आहे.