ठाणे - गोरखपूर एक्सप्रेसमध्ये मुलीवर अत्याचार केल्याची घटना ठाणे स्थानकावर उघकीस आली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे लोहमार्ग पोलीस करणार आहेत.
मुलगी आणि आरोपी हे दोघेही परिचित आहेत. दोघेही गोरखपूर एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्याने मुलीला टॉयलेटमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा गाडी ठाणे स्टेशनवर आली तेव्हा मुलीवर अत्याचार झालेला होता. तिकीट तपासणीसाने तिकीट नसल्याने मुलीला गाडीतून उतरवले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पीडितेने कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तो ठाणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे रेल्वे पोलीस करणार आहेत. अगोदर मुलीची वैद्यकीय तपासणी करणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.