महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार, आरोपी फरार - bhiwandi crime

चोवीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी शारिरीक अत्याचार केल्याची घटना भिवंडीतील शहरातील गैबीनगर येथे घडली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Apr 26, 2019, 9:16 AM IST

ठाणे- चोवीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी शारिरीक अत्याचार केल्याची घटना भिवंडीतील शहरातील गैबीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी अत्याचारी तरुण आसिफ खान (वय २४, रा. भंडारी चौक, दिवांशाह दर्गा) याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित युवती टेलरींगचे काम करत असून आसिफ आणि तरुणीच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. जून २०१८ पासून त्यांच्यांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. त्यानंतर तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान त्याने युवतीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यातुन ती तीन महिन्यांची गरोदर राहिल्याने तिने आरोपी आसिफ याच्याकडे लग्न करण्यासाठी विचारणा केली. मात्र, त्याने लग्नास नकार देवून तो तिला टाळू लागला. समाजात आपली बदनामी नको यासाठी प्रथम गर्भपात करू व त्यानंतर लग्न करू असे खोटे सांगून आरोपीने तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले.

गर्भपातानंतर आरोपीने तिला टाळण्यास सुरुवात केली. संपर्क करूनही प्रियकर आपल्याला सहकार्य करत नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने शांतीनगर पोलीस ठाण्यात जावून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण अत्याचारी आसिफ यास लागताच तो फरार झाला असून त्याचा शोध तपास अधिकारी ए.पी.आय दुर्गेश दुबे करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details