ठाणे- एका नराधम बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पीडित मुलीने तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला गजाआड केले आहे.
बाप लेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणारा नराधम बाप गजाआड - ठाणे
पीडित मुलगी रात्रीच्या सुमारला घरात झोपली होती. यावेळी या नराधमाने तिच्याशी लगट करीत अश्लील चाळे करायला सुरुवात केली. त्यावेळी वडिलांच्या अश्लील स्पर्शाने पीडिता भयभीत होवून जागी झाली आणि तिने घराबाहेर पळ काढला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी कोळशेवाडी परिसरात वडील आणि लहान भावासोबत राहते. तिच्या आई-वडिलांचे वाद सुरू असल्याने आई डोंबिवली येथे राहते. आईची तब्येत बरी नसल्याने पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ वडिलांकडे कोळशेवाडी येथे राहत होते. त्यातच गुरुवारी रात्रीच्या सुमारास तिच्या नराधम वडिलांची वाईट नजर पीडित मुलीवर पडली.
पीडित मुलगी रात्रीच्या सुमारला घरात झोपली होती. यावेळी या नराधमाने तिच्याशी लगट करीत अश्लील चाळे करायला सुरुवात केली. त्यावेळी वडिलांच्या अश्लील स्पर्शाने पीडिता भयभीत होवून जागी झाली आणि तिने घराबाहेर पळ काढला. त्यानंतर तिने घडलेली हकीकत शेजारी राहणाऱ्या महिलेला आणि आपल्या आईला सांगताच तिच्या आईला धक्काच बसला. आईने पीडित मुलीला घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. यावरून पोलिसांनी नराधम वडिलांविरोधात विनयभंगासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.