नवी मुंबई - प्रेम विवाह ( Love Marriage Dispute ) केलेल्या तरुणीला तिच्या वडिलाने जबरदस्तीने परत घरी आणल्याने तरुणीने आत्महत्या ( Girl Commits Suicide ) केली. ही घटना रबाळे येथे मंगळवारी रात्री घडली. स्वाती शंकर साळुंखे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
Love Marriage Dispute : प्रेमविवाह करुन थाटला संसार, वडिलांनी जबरदस्तीने घरी आणल्याने तरुणीने संपवले जीवन - नवी मुंबईत आढळला तरुणीचा मृतदेह
स्वातीने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला होता. हा प्रेमविवाह स्वातीच्या कुटुंबातील नातेवाईकांना मान्य नव्हता. त्यामुळे तिला वडिलांनी जबरदस्तीने परत आणले होते. त्यातूनच मंगळवारी रागाच्या भरात स्वाती घराबाहेर पडली. अन् त्यानंतर तिचा मृतदेह रबाळे तलावात आढळल्याने खळबळ उडाली.
मुलीचा प्रेमविवाह झाल्याने कुटुंबिय होते नाराज - रबाळे येथील स्वातीने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह ( Love Marriage Dispute ) केला होता. हा प्रेमविवाह स्वातीच्या कुटुंबातील नातेवाईकांना मान्य नव्हता. त्यामुळे तिला वडिलांनी जबरदस्तीने परत आणले होते. त्यामुळे स्वाती तणावात होती.
रबाळे तलावात उडी मारुन संपवले जीवन - स्वातीने प्रेमविवाह ( Love Marriage Dispute ) केल्यानंतर तिच्या घरातील नातेवाईक संतापले होते. त्यातच तिला वडिलांनी परत आणल्याचा राग स्वातीच्या मनात होता. त्यामुळे ती सोमवारी संध्याकाळी घरातून रागाने बाहेर पडली. तिच्या कुटूंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र स्वाती कुठेही सापडली नाही. अखेर मंगळवारी रात्री रबाळे तलावात स्वातीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, याप्रकरणी अधिक तपास रबाळे पोलीस करत आहेत. हा मृत्यू घातपात आहे की आत्महत्या याचीही पोलीस चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.