महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जीआयपीआर धरण १०० टक्के भरले; धरणाची भिंत फुटली, २५ लाख नागरिकांना पुराचा धोका

काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी या भिंतीला तडे गेल्याचे निर्दशास आणले होते. त्याबाबत वृत्तपत्रामध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाने या बातमीकडे दुर्लक्ष केरून वेळेत दखल घेतली नाही.

जीआय पीआर धरण 100 टक्के भरले आहे

By

Published : Jul 28, 2019, 9:05 PM IST

Updated : Jul 28, 2019, 10:36 PM IST

ठाणे - अंबरनाथ तालुक्यातील ब्रिटिश कालीन जीआयपीआर धरण १०० टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणाची भिंत फुटली आहे. त्यामुळे धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. शेकडो एकर शेतजमिनीत धरणाचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जीआयपीआर धरण १०० टक्के भरुन धरणाची भिंत फुटली आहे.

विशेष म्हणजे हे धरण वालधुनी नदीच्या उगम स्थानादरम्यान उभारले असून हे धरण रेल्वेच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी या भिंतीला तडे गेल्याचे निर्दशास आणले होते. त्याबाबत वृत्तपत्रामध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाने या बातमीकडे दुर्लक्ष केरून वेळेत दखल घेतली नाही. त्यामुळे ही संरक्षण भिंत पडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, हजारो एकर जमिनीवरील भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अनेक शेतीचे बांधही फुटले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तसेच कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ शहरात वालधुनी नदीचे पाणी शिरून या गावांना धोका निर्माण झाला आहे.

Last Updated : Jul 28, 2019, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details