ठाणे : मेडिकल स्टोअरमध्ये उधारी औषध मागणाऱ्या आजोबांना पाहून अर्जुन देशपांडे हा युवक प्रेरित झाला. औषध क्षेत्रात असलेल्या अनेक भारताबाहेरील कंपन्या भारतात हजारो कोटींचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे भारतातील पैसा भारताच्या बाहेर जात आहे. म्हणून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी अर्जुन देशपांडे यांनी जेनेरिक आधार या नावाने स्वस्त औषध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या 3 वर्षात हा व्यवसाय 500 कोटींपर्यंत पोहोचला. त्यामुळे ही औषधे घेणाऱ्या लाखो रुग्णांना स्वस्त औषध मिळाल्याने कमीत कमी 2000 कोटींचा फायदा झाला आहे. कॅन्सर, हृदयरोग मेंदूचे आजार, मधुमेह, ब्लड प्रेशर या आजाराचे रुग्ण जर या औषधांचा वापर करतील तर त्यांच्या औषाधांवरील खर्चात 80 टक्के बचत होवू शकते असे अर्जुन यांनी सांगितले.
गरजूना स्वस्तात औषधे दिली : ही कंपनी अर्जुनने वयाच्या १६व्या वर्षी स्थापन केली. कंपनी उत्पादकांकडून थेट औषधांची खरेदी करते आणि ग्राहकांना विकते. खासकरून करोनाच्या काळात अर्जुनने अनेक गरजूना स्वस्तात औषधे पुरवली आहेत. रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधारचे आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले. देशात सध्या करोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे. जेनेरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतले आहे.
८५ ते ९०% औषधे ही भारतातच बनतात :४ महिन्यात ठाण्यातून सुरू झालेली कंपनी स्वस्त दरात औषधे १०० हून जास्त शहरात देशभरात उपलब्ध करून दिली आहेत. ४ महिन्याच्या लॉकडाऊन काळात लोकांना रोजगार संधी मिळाली. ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किंमतीत मिळावी. तसेच भारतातील ६०% लोकांना औषधे परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाहीत. पण ८५ ते ९०% औषधे ही भारतातच बनतात, ही जेनेरिक औषधे आहेत. त्यामुळे जेनेरिक औषधे कमी दरात उपलब्ध करण्याचा अर्जुन देशपांडेंचा प्रयत्न आहे.