ठाणे -मध्य रेल्वेच्या खर्डी रेल्वे स्थानकानजीक मालगाडीच्या एका कॅप्सूल टाकीमधून गॅस गळती होत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रेल्वेमार्गानजीक राहणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा सुमारे ३७ टन गॅस या टाकीमधून वाहून नेला जात आहे.
मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारी ही मालगाडी सकाळी ८ वाजताच्या सुमारास खर्डी स्थानकात आली. तेव्हा या मालगाडीच्या एका कॅप्सूल टाकीमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आले. त्यांनतर खर्डी रेल्वे स्थानकात अग्निमशन दल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर ही टाकी मालगाडीपासून वेगळी करण्यात आली.