नवी मुंबई - ठाणे-बेलापूर रस्त्यावरिल काम सुरू असताना महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत होती. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशनन दलाला घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गॅस गळती रोखली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
ठाणे-बेलापूर रस्त्यावर पदपथाचे काम सुरू आहे. त्यासाठी क्रेनच्या सहाय्याने रस्ता खोदण्याचे काम सुरू होते. त्यावेळी क्रेन चालकाचा रस्ता शोधताना भूमिगत महानगर गॅसची पाईपलाईनला क्रेनचा धक्का लागला आणि पाईपलाईन फुटली. यावेळी मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होऊ लागली. तब्बल एक तास या पाईपलाईनमधून गॅस गळती होत होती आणि त्याच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली होती.