महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gangster Encounters : १४ वर्षांपासून गुंडांच्या एन्काऊंटरसाठी पोलिसांच्या बंदुकीतून गोळी सुटलीच नाही - खंडणी वसूलीसाठी त्रास देणे

ठाणे शहरात 90 च्या दशकात नामांकित गुंडांच्या टोळ्यांनी (Notorious Gangster Gang) बिल्डर आणि व्यापाऱ्यांना खंडणीसाठी (harassment for extortion) सळो की पळो करून सोडले होते. पोलिसांनी या गुंडांचा बंदोबस्त करत 100 पेक्षा अधिक गुंडांना एन्काउंटर (Gangster Encounters) करून ठार केले. यामध्ये रवींद्र आंग्रे, प्रफुल्ल जोशी, दत्ता घुले आदींसारख्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र मागील 14 वर्षांपासून गुंडांचे एन्काऊंटर थांबले (Gangster Encounters Stopped) असल्याने गुंडांची हिम्मत पूर्वीप्रमाणे वाढली आहे. (Thane Crime) सध्या संघटित टोळ्यांचे वर्चस्व संपले असले, तरी व्यावसायिक वर्चस्वावरून ठाणे पोलीस आयुक्तालयात हद्दीत गोळीबारीच्या घटना घडत आहेत. (Latest news from Thane)

Gangster Encounters Stopped
गुंडांचे एन्काऊंटर

By

Published : Dec 19, 2022, 6:51 PM IST

ठाणे : ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत यापूर्वीही अनेक संघटित गुन्हेगारांच्या (Notorious Gangster Gang) टोळ्यांनी खंडणीसाठी (harassment for extortion) व्यापाऱ्यांना, बांधकाम व्यावसायिकांना हैराण केले होते. ९० च्या दशकात तर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाऊद, छोटा राजन, अबू सालेम, सुरेश मंचेकर, अमर नाईक आदी संघटित टोळ्यांचा बोलबाला होता. त्या काळात या नामचीन गुंडाच्या टोळीतील १०० हून अधिक गुंड एन्काऊंटरमध्ये (Gangster Encounters) मारले गेलेत. त्याकाळी रवींद्र आंग्रे, प्रफुल्ल जोशी, दत्ता घुले आदींसारख्या जिगरबाज अधिकाऱ्यांनी शतकभर गुंडांचा खात्मा केला. (Thane Crime) त्याच ठाणे पोलिसांच्या बंदुका १४ वर्षांपासून गुंडांच्या एन्काऊंटरची वाट पाहून थंड (Gangster Encounters Stopped) झाल्याचे दिसून येत आहेत. (Latest news from Thane)


या गुंडांचे एन्काउंटर: विशेष म्हणजे काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात पाच गोळीबाराच्या घटनांच्या नोंद होऊन यामध्ये दोन नामचीन गुंडांची प्रतिस्पर्धी टोळी कडून हत्या करण्यात आली. तर दोन गुंड गंभीर जखमी झाले. हे हल्ले व्यावसायिक वादातून झाले. २००८ साली बंटी पांडे टोळीच्या जितू यादव याच्या शेवटच्या एन्काऊंट नंतर आतापर्यंत संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयात एकाही एन्काऊंटर झाल्याची नोंद नाही. मात्र गेल्या चार महिन्यांत गुंडांकडून गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटित गुन्हेगारीचा घेतलेला आढावा पाहता, ठाणे खंडणी विरोधी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ आणि पथकाने घोडबंदर परिसरात चकमकीत जितू यादव याचा २००८ साली एन्काऊंटर करून खात्मा केला होता. गुंड यादववर १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जिगरबाज अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या बल्लाळ यांच्यावर गुंड यादवनेही गोळी झाडली होती. मात्र सुदैवाने त्यांनी बुलेटप्रूफ जाकीट घातल्याने ते बचावले होते.


गुंडांचा धुमाकूळ संपविला :यापूर्वी रविंद्र आंग्रे, दत्ता घुले, कैलाश डावखर, प्रफ्फुल जोशी या सारख्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी संघटित टोळ्यांचे वर्चस्व मोडून काढले होते. त्याकाळी व्यापाऱ्यासह नागरिकांना गुंडांच्या दहशतीने हैराण केले होते. विशेष म्हणजे २००० साली तर विविध पोलीस ठाण्यांत खंडणीच्या तब्बल २१० तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातही त्या काळात सुरेश मंचेकर टोळीने ठाणे जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर ते वसई विरार-पट्ट्यात मंचेकर टोळी खंडणीसाठी व्यापाऱ्यांना फोन करत असे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिक मोठ्या दहशतीखाली होते, जोडीला छोटा राजन, दाऊद, छोटा शकील, हेमंत पुजारी, रवी पुजारी, अमर नाईक टोळीचे गुंड खंडणीसाठी व्यापाऱ्यांना, बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन करत असत. त्यांचीही जिल्ह्यात दहशत पसरली होती. या सर्वांचे वर्चस्व मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते.


अधिकाऱ्यांनी स्वीकारले आवाहन :त्यानुसार रवींद्र आंग्रे, दत्ता घुले, कैलाश डावखर, प्रफुल्ल जोशी, चंद्रकांत जोशी या पोलीस अधिकाऱ्यांनी आव्हान स्वीकारले. यात सर्वाधिक दहशत सुरेश मंचेकर टोळीची होती. त्यामुळे मंचेकर टोळीचा खात्मा करण्यासाठी ठाणे खंडणी पथकाचे पोलीस अधिकारी त्याचा शोधात लागले होते. त्यानुसार टोळीचा म्होरक्या सुरेश मंचेकर याचा मागोवा काढता रवींद्र आंग्रेसह त्यांच्या पथकाने १५ ऑगस्ट २००३ साली कोल्हापूर येथे चकमकीत मंचेकरचा एन्काऊंटर करून ठार मारले. या शिवाय छोटा गण्या, या छोटा राजन टोळीतील खतरनाक गुंडाची त्याच्या तीन साथीदारांसह रवींद्र आंग्रे यांनी ठाण्यातील येऊर येथे खात्मा केला होता.

यांच्या नावावर गुंड्याच्या एन्काऊंटरची नोंद :विशेष म्हणजे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तत्कालीन अधिकारी रवींद्र आंग्रे यांच्या नावावरच सर्वाधिक २३ एन्काऊंटरची नोंद आहे. नंतर दत्ता घुले, कैलाश डावखर, प्रफुल्ल जोशी, चंद्रकांत जोशी यांच्या नावावर गुंड्याच्या एन्काऊंटरची नोंद आहे. यातील डावखर यांनी एकाचवेळी ७ दरोडेखोरांचा डोंबिवलीतील खंबाळपाडा भागात एन्काऊंटर करून खात्मा केला होता. सध्या संघटित टोळ्यांचे वर्चस्व संपले असले, तरी व्यावसायिक वर्चस्वावरून ठाणे पोलीस आयुक्तालयात हद्दीत गोळीबारीच्या घटना घडत आहेत.

गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ :यातील ४ घटना थेट ठाणे शहरात घडल्या आहेत. तर नुकतीच एक घटना भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्यातच गुंडांकडून गोळीबाराच्या घटना मधल्या काळात वाढल्या आहेत. दरम्यानच्या काळात रवी पुजारी आणि हेमंत पुजारीच्या काही गुंडांबरोबर दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे पोलिसांनी खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती. गुंड इक्बाल कासकर आजही तुरुंगात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details