ठाणे : संजय अनिल मखवाना उर्फ टेडी (वय २२, रा. आनंदवाडी, कल्याण पूर्व) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे. तर विशाल प्रभाकर पाटोळे (वय २२, रा. खडेगोळवली, कल्याण पूर्व) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साथीदाराचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्लेखोरावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हल्लेखोर आणि जखमी दोघेही मित्र :पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विशाल हा कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात असलेल्या आत्माराम नगरमध्ये कुटुंबासह राहतो. तर हल्लेखोर टेडी हा कल्याण पूर्वेतील आनंदवाडी येथे राहत असून तो कल्याण पूर्वेत गावगुंड म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे, तक्रारदार विशाल आणि हल्लेखोर टेडी या दोघांनी यापूर्वी चोरीचे गुन्हे सोबत केल्याने त्यांची आधीपासूनच ओळख असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
विशालवर चाकूने हल्ला :तक्रारदार विशाल हा ६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी तो कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरून पायी जात असतानाच हल्लेखोर टेडीने विशालकडे चहा पिण्यासाठी पैश्याची मागणी केली मात्र विशाल म्हणाला की, माझ्याकडे पैसे नसल्याने मी देऊ शकत नाही. आधीच मला कामावर जाण्यास उशीर झाल्याने पैश्याची मागणी करणाऱ्या हल्लेखोराला बोलताच त्याने विशालला शिवीगाळ करत मारहाण करण्यात सुरुवात केली. त्यामुळे विशालही त्याला मारहाण करत असल्याचे पाहून हल्लेखोर टेडीने अचानक खिश्यातून धारदार चाकू काढून विशालवर भर रस्त्यातच सपासप वार करून घटनास्थळावरून पळून गेला. विशाल गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल :या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी जखमी विशालचा जबाब घेऊन त्याच्या तक्रारीवरून हल्लेखोर संजय उर्फ टेडी याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. घटनेपासून हल्लेखोर संजय उर्फ टेडी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक आर. एन. चव्हाण करीत आहेत.
हेही वाचा:
- Fake Income Tax Raid : दिल्लीतील व्यावसायिकावर 'स्पेशल 26' स्टाईल रेड, 7 जण बनावट आयकर अधिकारी बनून आले
- Thane Crime : बायकोनेच काढला नवऱ्याचा काटा, गळा आवळून केला खून
- Thane Crime : 2 वर्षाच्या चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार, वारंवार करत होता असे कृत्य