ठाणे - एका १३ वर्षीय आदिवासी शाळकरी अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील पडीक बंगल्यात घडली. याप्रकरणी पोक्सो कायद्याअंर्तगत चार जणांविरुद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे चारही आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या वयाची पुष्टी झाल्यावरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पीडिता राहत असलेल्या गावातीलच चार नराधमांचा अत्याचार ..
पीडितेचे आईवडील आदिवासी असून शेतमजुरी करून आपली उपजीविका चालवतात. तर पीडिता ७ वीत शिक्षण घेत आहे. दोन महिन्यापूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर तिला आईने किराणा दुकानावर जाण्यास सांगितले. दुकानावरून परत येत असताना चारही आरोपींनी एका बहाण्याने तिला रस्त्यातील एका पडीक बंगल्यात तिला नेले आणि आळीपाळीने बलात्कार केला. त्यांनतर कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या वडिलांना ठार मारू अशी धमकी दिली होती. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून काल (शनिवार) रात्रीच्या सुमारास एक तासात चारही आरोपींना अटक केली.
धक्कादायक ! १३ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार - ठाणे लेटेस्ट क्राईम न्यूज
पीडितेचे आईवडील आदिवासी असून शेतमजुरी करून आपली उपजीविका चालवतात. तर पीडिता ७ वीत शिक्षण घेत आहे. दोन महिन्यापूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर तिला आईने किराणा दुकानावर जाण्यास सांगितले. दुकानावरून परत येत असताना चारही आरोपींनी एका बहाण्याने तिला रस्त्यातील एका पडीक बंगल्यात तिला नेले आणि आळीपाळीने बलात्कार केला.

पीडितेच्या वडिलांना मारहाण
पीडितेचे आई वडील पीडितेला श्रमजीवी संघटनेच्या अंबाडी कार्यालयात घेऊन आले होते. तिथे पीडितेच्या वडिलांनी मारहाण झाल्याची माहिती दिली. मात्र मारहाण कशामुळे करण्यात आली याचे कारण पीडितेचे वडील सांगण्यात टाळत होते. त्यामुळे श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून, ते राहत असलेल्या गावातील परिस्थिती माहिती घेतली. त्यानंतर मुलीबाबत वाद असल्याचे समोर आले. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जया पारधी यांनी पीडीत मुलीला बाजूला घेऊन खाजगीत विचारणा केली असता सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला.
श्रमजीवी आणि पोलिसांच्या सहकार्याने पीडित कुटूंबाला न्याय ..
श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामीण पोलीस यंत्रणेने तत्परता दाखवत या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप पाहता, अति. पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे हे गंभीर प्रकरण श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे समोर आले.