पालघर/नालासोपारा -टाळेबंदीच्या काळात नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. याच पार्श्वभूमीवर तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरट्यांना अटक करून ७ मोटार सायकली जप्त केल्या असून याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
नालासोपारा येथे मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड - नालासोपारा क्राईम घडामोडी
तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरट्यांना अटक करून ७ मोटार सायकली जप्त केल्या असून याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना लक्षात घेऊन पोलीस आयुक्त सदानंद दाते, अपर पोलीस आयुक्त एस.जयकुमार, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक गंगाराम वळवी, तुळींज पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी, बाळू बांदल, शिवानंद सुतनासे, शेखर पवार यांनी गुप्त माहिती मिळवून आरोपी विशाल नाईक, जय चिंदरकर या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून तुळींज पोलीस ठाणे, विरार पोलीस ठाणे, वाळील पोलीस ठाणे, बांगूरनगर पोलीस ठाणे (मुंबई शहर) व पेण पोलीस ठाणे जिल्हा रायगड या पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या ठिकाणी सुद्धा मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ७ मोटारसायकल जप्त केल्या असून केवळ मौज-मजेसाठी ह्या चोऱ्या केल्या जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पाटील यांनी दिली.