ठाणे -एका १४ वर्षीय अल्पवयीन मोलकरीणवर मालकाने जंगलात बळजबरीने बलात्कार (Physical Abused) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्यात (Ganeshpuri Police Station) श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत आरोपी मालकाला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला गजाआड केले आहे. लडकू मुकणे असे अटक आरोपीचे नाव आहे.
- ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार -
पीडित मुलीच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले, तर तिची आईही एकटीला सोडून निघून गेली. त्यामुळे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या पीडिताला भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या आरोपीने नातवंड आणि घराच्या बकऱ्या चरण्यासाठी तीला कामाला ठेवले होते. त्यातच मे महिन्यात पीडित मुलगी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता आरोपी मालकाने तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. मात्र, जिवाच्या भीतीने पीडिता घाबरल्याचे पाहून आरोपी मालकाची हिंमत वाढली आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता.
- आरोपीच्या पत्नीनेच फोडले नराधम नवऱ्याचे बिंग -