नवी मुंबई - काही केल्या भाजपचे नेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून दोन्हीही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दर १० वर्षांनी बाप बदलणाऱ्यातले आम्ही नाही, असे वक्तव्य करत जितेंद्र आव्हाड यांनी नाईकांवर प्रहार केला होता. या त्यांच्या टीकेला आज गणेश नाईकांनी उत्तर दिले आहे. शरद पवार यांनीही पक्ष बदलला मग त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी आव्हाडांनी केला आहे.
'शरद पवारांनीही पक्ष बदलला मग त्यांचाही बाप काढणार का?' - Ganesh Naik navi mumbai
भाजपचे नेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून दोन्हीही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आज गणेश नाईकांनी पुन्हा जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केले आहे.
आव्हाड यांनी आधी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला होता. नाईक यांनी आधी शिवसेनेसोबत गद्दारी केली. आता राष्ट्रवादीशी गद्दारी केली. गद्दारी गणेश नाईकांच्या रक्तातच आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी नाईकांचा समाचार घेतला होता. त्याला उत्तर देताना नाईक म्हणाले की, 'ये तेरे बस की बात नही... तेरे बाप को बोल', असा टोला त्यांनी आव्हाडांना लगावला होता. त्यांनतर पुन्हा आव्हाडांनी, दर १० वर्षांनी बाप बदलणाऱ्यातले आम्ही नाही असे म्हणत गणेश नाईकांना प्रतिउत्तर दिले होते. या त्यांच्या टिकेला गणेश नाईक यांनीही प्रतिउत्तर दिले आहे. शरद पवार यांनीही अनेक वेळा पक्ष बदलला, मग काय त्यांचाही बाप काढणार काय? असा सवाल नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना केला आहे.
गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे द्या,आणि गुन्हा दाखल करा, हा गणेश नाईक ताकदीने उभा आहे, असे आव्हान गणेश नाईकांनी दिले होते. कोण म्हणतो गणेश नाईक खंडणीबहाद्दर आहे? गणेश नाईकांवर खंडणीचा गुन्हा सोडा, साधी एनसीही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून गणेश नाईक यांच्यावर अत्यंत जहाल शब्दांत टीका केली. मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही. जितेंद्र आव्हाड स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो, कोणाचे चोरलेले डायलॉग मारत नाही. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो. मी एकदाच नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथककल्लीच सुरु केली आहे. अजून तर मी शंभरवेळा जाणार आहे. त्यानंतर माझा बापही येईल, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. आव्हाडांनाही गणेश नाईक यांनी कडक शब्दात प्रतिउत्तर दिले आहे.