ठाणे - लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याबाबत ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची ३ तास बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीकडून गणेश नाईक यांचे नाव आघाडीवर होते. त्यांचे नाव निश्चित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून गणेश नाईक यांचे नाव आघाडीवर - mahapalika
येणारी लोकसभा निवडणूक पाहता सर्वच पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी देखील कामाला लागले आहे. आज ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी बैठक ठाण्यात पार पडली.
येणारी लोकसभा निवडणूक पाहता सर्वच पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी देखील कामाला लागले आहे. आज ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी बैठक ठाण्यात पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच गणेश नाईक, ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे, महापालिका विरोधीपक्ष नेते मिलिंद पाटीलसह ठाणे राष्ट्रवादीचे गटनेते हनुमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला उपस्थित होते.
या बैठकीत ठाण्यातील राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित करण्यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांच्या जागी गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा रंगली होती. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी हे फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच ठरवणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. ठाण्याप्रमाणे सर्व ठिकाणी अशा बैठका घेण्यात येणार असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले.