ठाणे : Ganesh Festival २०२३ : ठाण्यातील मुरबाडच्या एका चित्रकारानं गणरायासमोर आपल्या चित्रकलेच्या माध्यामध्यातून पर्यावरणचा देखावा साकारत सजावट केलीय. विशेष म्हणजे या चित्रकारानं गणपतीला साकडं घालून पर्यावरण बचावासाठी प्रार्थनाही केली आहे. सचिन पोतदार असं या चित्रकाराचे नाव आहे. ( Environment Protect Scene in front of Lord ganesha )
व्यंग चित्र काढत पर्यावरण बचावाचा संदेश : सध्याच्या घडीला सर्वत्र पर्यावरणाचा नाश करून झाडे, जंगल नष्ट होत आहेत. त्यामुळे येत्या काळात पुरेसे पाणीही मिळणार नसल्याचे या चित्रकाराने आपल्या चित्रकलेच्या माध्यामध्यातून देखावा साकारत गणरायाची सजावट केलीय. गेल्या काही वर्षात मुरबाड तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लाकूड माफियांकडून झाडे तोडून नष्ट केली जात आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून पुरेसे पाणीही येत्या काळात नागरिकांना उपलब्ध होणार नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणपतीची पर्यावरणपुरक सजावट करत एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रकाराने केलाय. तसेच पर्यावरण वाचवण्याचं साकडही गणपती बाप्पाला घातल्याचं या चित्रकार सचिन पोतदारांनी सांगितलंय. त्यांनी आपल्या चित्रांमध्ये झाडे, पाणी, पर्यावरणपूर्वक देखावा तयार करून व्यंग चित्रे काढत पर्यावरण बचावाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्याचंही चित्रकार सचिन पोतदारांनी सांगितलंय.