ठाणे - महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ठाण्याच्या ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या संचालित सर्व शाळांमध्येही गांधी जयंतीनिमीत्त आगळावेगळा उपक्रम राबवत गांधीजींच्या वेशात पदयात्रा काढली.
गांधी जयंतीनिमित्त ठाण्यात चिमुकले गांधी दिसले रस्त्यावर - गांधी@150 ठाणे बातमी
2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या १५० जयंतीनिमित्त ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या सर्व शाळेतील वेगवेगळ्या वर्गातील एकूण १५० मुला-मुलींची गांधीजींच्या वेशात ब्राह्मण शिक्षण मंडळ संचलित महाराष्ट्र विद्यालय ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या १५० जयंतीनिमित्त ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या सर्व शाळेतील वेगवेगळ्या वर्गातील एकूण १५० मुला-मुलींची गांधीजींच्या वेशात ब्राह्मण शिक्षण मंडळ संचलित महाराष्ट्र विद्यालय ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी पदयात्रेत गांधीजींसोबत अनेक वीर मातांचा वेश घेतलेल्या मुलींनी देखील सहभाग घेतला. मुलांनी गांधींच्या वेशात स्वच्छता आणि सत्यता हा संदेशही लहानग्यांनी यावेळी दिला
हेही वाचा - ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली