महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : अखेर 'त्या' महिलेच्या हत्येचा उलगडा; मैत्रिणीनेच गळा आवळून दागिने केले लंपास - ठाणे महिला हत्या

घरात घुसून अज्ञात मारेकऱ्याने एका ५८ वर्षीय महिलेची ( 58 Year Old Women Murder In Thane ) हत्या केल्याची धक्कादायक घटना काल सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांच्या ५ पथकाने तपासाची चक्रे वेगात फिरवत आरोपी मृत्यू झालेल्या महिलेच्या मैत्रीणीला हत्येप्रकरणी ( Women Murder For Jewelry In Thane ) बेड्या ठोकल्या आहे.

Thane Crime
Thane Crime

By

Published : Jan 18, 2022, 7:47 PM IST

Updated : Jan 18, 2022, 7:56 PM IST

ठाणे - घरात घुसून अज्ञात मारेकऱ्याने एका ५८ वर्षीय महिलेची ( 58 Year Old Women Murder In Thane ) हत्या केल्याची धक्कादायक घटना काल सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. ही घटना डोंबिवली पूर्व परिसरात असलेल्या टिळक नगर चौकातील आनंद शीला या सोसायटीत घडली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्या अज्ञात मारेकऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरु केला. विशेष म्हणजे पोलिसांच्या ५ पथकाने तपासाची चक्रे वेगात फिरवत आरोपी मैत्रीणीला हत्येप्रकरणी ( Women Murder For Jewelry In Thane ) बेड्या ठोकल्या आहे.

प्रतिक्रिया

आरोपी महिला निघाली पोळीभाजी विक्री केंद्राची मालकीण -

खळबळजनक बाब म्हणजे आरोपी महिला मृत महिलेची जुनी मैत्रीण असून तिचे डोंबिवलीत पोळी भाजी विक्रीचे केंद्र आहे. हत्येच्या दिवशी ती झोपण्याच्या बहाण्याने मृतकच्या घरात गेली होती. त्यावेळी रात्रीच्या सुमारास हत्या करून मृत महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सिमा सुरेश खोपडे, (४०) रा. पाथर्ली, डोंबिवली पूर्व, असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर विजया बावीस्कर (५८) असे हत्या झालेल्या या महिलेचे नाव आहे.

म्हणून पोलिसांनी मिळाली तपासाची दिशा -

मृत विजया या टिळक नगर चौकातील आनंद शीला या सोसायटीच्या एका घरात एकट्याच राहत होत्या. रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी सीमा ही मृत मैत्रिणीच्या घरात झोपण्याच्या बाहान्याने गेली होती. त्यावेळी तिची नजर मृतकच्या दागिन्यांवर पडली होती. त्यामुळे तिने गळा आवळण्याचा कट रचून तिची हत्या केली. त्यांनतर तिच्या अंगावरील सोन्याची गळयातील चैन, कानातील रिंगा, अंगठी, हातातील दोन बांगड्या असा ऐवज लंपास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मृतकच्या घरी घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेमुळे हत्येचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांचे ५ पथके आरोपीच्या शोधात रवाना केली होती. मात्र, कुठलाही सुगावा नव्हता त्यामुळे पोलिसांनी मृतकच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, मृतकच्या अंगावर दागिने गायब असल्याचे समोर आले आणि इथेच पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.

कोम्बींग ऑपरेशनमुळे आरोपी महिला २४ तासातच अटक -

तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र तांत्रीक व गोपनिय माहितीच्या आधारे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तपासणीत एका महिला पहाटेच्या ३ वाजता रस्तावरुन जाताना दिसली. त्यांनतर टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात सोमवारी रात्रीच्या वेळी कोम्बींग ऑपरेशन राबवुन गुन्ह्यातील आरोपी महिलेला २४ तासातच ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिनेच दागिन्यांसाठी गळा आवळून विजयाची हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. मात्र, गुन्ह्यात आणखी कोणी आरोपीत आहेत काय, अथवा हा गुन्हा काही मालमत्तेच्या वादातून झाला आहे काय, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा -Chandrakant Patil On Nana Patole : नाना पटोलेंच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार : चंद्रकांत पाटील

Last Updated : Jan 18, 2022, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details