ठाणे- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकीकडे चिकनकडे पाठ फिरवली असताना, चिकन खाण्यासाठी मागितल्याच्या वादातून एका मित्राने मित्राचीच चाकूने भोकसून हत्या केली. कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. संतोष महतो असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे.
धक्कादायक! चिकन खायला मागणे बेतले जीवावर.. मित्राने चाकू भोकसून केली हत्या - thane crime news
कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रोड परिसरात राहणाऱ्या प्रमोद गुनुरे याने गुरुवारी दुपारच्या सुमाराला जेवणासाठी चिकन बनविले. दरम्यान, प्रमोदचा मित्र संतोष महतो त्याठिकाणी आला. संतोषने प्रमोदला चिकन खाण्यासाठी मागितले. मात्र, यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, प्रमोदने संतोषवर चाकूने सपासप वार केले.
हेही वाचा-COVID-19 LIVE : देशात २२३ रुग्ण, तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२..
कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रोड परिसरात राहणाऱ्या प्रमोद गुनुरे याने गुरुवारी दुपारच्या सुमाराला जेवणासाठी चिकन बनविले. दरम्यान, प्रमोदचा मित्र संतोष महतो त्याठिकाणी आला. संतोषने प्रमोदला चिकन खाण्यासाठी मागितले. मात्र, यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, प्रमोदने संतोषवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात संतोषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून प्रमोदला अवघ्या सहा तासांच्या आत अटक केली आहे.