ठाणे - गोठ्यातील शेणाचा वास आणि घाण पाण्यावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ तालुक्यातील पालेगावमध्ये ही घडली. तर दोन कुटुंबांमधील राड्याचा सगळा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
गोठ्यातील घाणीवरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; अंबरनाथ तालुक्यातील घटना - Shiwajinagar police station
गोठ्यातील शेणाचा वास आणि घाण पाण्यावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये जोरदार मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ तालुक्यातील पालेगावमध्ये ही घडली.
अंबरनाथ तालुक्यातील पालेगावमध्ये राहणाऱ्या देसाई आणि थोरवे यांच्या कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाले. या वादानंतर गोठ्यातील शेणाचा वास आणि घाण पाणी अंगणात येण्याच्या वादातून दोन्ही कुटुंबात हाणामारी सुरू झाली. यावेळी दोन्ही कुटुंबातील महिला, पुरुष मुलांनी एकमेकांवर लोखंडी रौड, दगड आणि लाठ्याकाठ्याने हल्ला चढवत तुंबळ हाणामारी केली. या हाणामारीत थोरवे कुटुंबातील एक महिला आणि पुरुष गंभीर जखमी झाले. तर देसाई कुटुंबातील सदस्य देखील जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.