ठाणे- घरी जायची ओढ परंतु जवळ पैसा नाही म्हणून रणरणत्या उन्हातून पायी जाणाऱ्या परराज्यातील लोकांना आज कोपरी पोलिसांच्या रूपात खाकीतील देवाचे दर्शन झाले. कोरोनाच्या धोक्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने सर्वजण जागच्या जागी अडकून पडले होते. त्यात सर्वात जास्त हाल हे परराज्यातून मुंबई ठाण्यात येऊन मोलमजुरी करणाऱ्यांचे झाले.
खाकीतील माणुसकीचे दर्शन; परराज्यात पायी जाणाऱ्यांना फुकट बस प्रवास - thane sranded labours
सरकारने दोन वेळचे अन्न तर दिले परंतु जवळ एकही पैसा नसल्याने हजारो लोकं पायीच निघाले होते. अशा ५० ते ६० जणांना कोपरी पोलिसांनी थांबवले. एसटी महामंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील धुळे जिल्ह्यातील शिरपूर डेपोपर्यंत त्यांना पोहचविण्यासाठी एक मोफत बस सोडली.
सरकारने दोन वेळचे अन्न तर दिले परंतु जवळ एकही पैसा नसल्याने हजारो लोकं पायीच निघाले होते. अशा ५० ते ६० जणांना कोपरी पोलिसांनी थांबवले. एसटी महामंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील धुळे जिल्ह्यातील शिरपूर डेपोपर्यंत त्यांना पोहचविण्यासाठी एक मोफत बस सोडली. रविवारी दुपारी निघालेल्या या बसमधून सोशल डिस्टनसिंगचे भान ठेवत अंतर राखण्यात आले होते.
ठाण्यातील तीन हात नका आणि माजिवडा या ठिकाणाहून देखील अशाच प्रकारची बस सेवा पुरविणार असल्याची माहिती कोपरी पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आगरकर यांनी दिली.