महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहावीच्या मुलांसाठी मोफत रिक्षाची सुविधा; मनसेचा उपक्रम - SSC

अनेकवेळा वेळेत रिक्षा मिळाली नसल्याने दहावीतील मुलांची अक्षरशः तारांबळ उडते. मुलांची ही महत्वाची अडचण लक्षात घेऊन मनसेच्या वतीने दहावीच्या मुलांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, यासाठी मोफत रिक्षाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दहावीच्या मुलांसाठी मोफत रिक्षाची सुविधा

By

Published : Mar 1, 2019, 11:10 PM IST

ठाणे - दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी उशीर होऊ नये, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वर्तक नगरमधील विध्यार्थ्यांना ही सुविधा सर्व पेपर्स संपेपर्यंत देण्यात येणार आहे.

अनेकवेळा वेळेत रिक्षा मिळाली नसल्याने दहावीतील मुलांची अक्षरशः तारांबळ उडते. मुलांची ही महत्वाची अडचण लक्षात घेऊन मनसेच्या वतीने दहावीच्या मुलांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, यासाठी मोफत रिक्षाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलांची ही अडचण लक्षात घेऊन इतर रिक्षाचालकांनी देखील हा उपक्रम राबवण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details