ठाणे:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी-वी मुंबई येथील रहिवासी शाहनवाज मिर्झा हुसेन यांचे भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावात मनी सुरत कंपाऊंडमध्ये मन्नत इंटरनॅशनल वेअरहाऊस नावाचे कपड्यांचे गोदाम आहे. या गोदामातून १४ फेब्रुवारी २०२२ ते २७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आरोपी आराध्या एंटरप्रायझेसतर्फे प्रा.दिलीप प्रकाश अग्रवाल (रा.भांडुप मुंबई), मारुती एक्सपोर्टरचे प्रा. प्रेमचंद मित्तल (रा.सांताक्रूझ), यश इंटर प्रोजेक्ट्स (विलेपार्ले,मुंबई), ग्लोबल फॅशन (गोरेगाव ,मुंबई), एस.ए. एंटरप्रायझेस (गोरेगाव,मुंबई), शंकर एंटरप्रायझेस (उल्हासनगर), एटीयूझेड एंटरप्रायझेस (दादर पूर्व) आदींनी ५० लाखांच्यावर स्पोर्ट वेअर (क्रीडा) कपडे विकत घेताना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले होते.
कापड व्यावसायिकाची कोट्यवधींनी फसवणूक: या कंपन्यांच्या मालकांनी सहा महिन्यांच्या कालावधीत शाहनवाज मिर्झा हुसेन यांच्या मन्नत इंटरनॅशनल वेअरहाऊस नावाच्या कपड्यांच्या गोदामातून स्पोर्ट वेअरचे विविध कपडे घेऊन जात फसवणूक केली आहे. या सातही कंपन्यांच्या कापड व्यावसायिकाची १ कोटी ५६ लाख ३० हजार ७० रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. या सर्वांविरुद्ध फसवणूक झालेल्या कापड व्यापारी शाहनवाज मिर्झा हुसेन यांच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिसांनी सात कंपन्यांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास राऊत करीत आहेत.
भिवंडीतही असाच प्रकार:असा एका फसवुकीचा प्रकार भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. मृतक वडिलांना जिवंत भासवून नोटरी करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असगराली मोहमद अली अन्सारी, साकीब असगरअली अन्सारी, असिफ असगरअली अन्सारी, कासिफ असगरअली अन्सारी, सय्यद मोहमद नझीर नकवी, झेड.ए.शेख, मिर्जा अरशद वजीर बेग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.