नवी मुंबई - सायन पनवेल महामार्गावर आज (शनिवारी) पुन्हा एकदा गावी जाणाऱ्या 40 प्रवाशांना वाहतूक विभाग आणि पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी दुधाच्या गाडीतून चोरून 15 प्रवासी याच मार्गावरून गावी जात असल्याचे समोर आले होते. संचारबंदी लागू केल्यानंतर शहरातून मोठ्या प्रमाणात लोंढेच्या लोंढे गावी जात आहेत.
कोरोना इफेक्ट: सायन पनवेल महामार्गावर गावी जाणारे 40 प्रवासी ताब्यात, पोलिसांची कारवाई - corona
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोरून गावी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. वाहतूक सेवा बंद असल्याने नागरिक मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या मार्गाने गावी जात आहेत. ट्रक आणि टेम्पोमधून लपून प्रवास करणाऱ्या 40 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथे नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना इफेक्ट: सायन पनवेल महामार्गावर गावी जाणारे 40 प्रवाशी ताब्यात, पोलिसांची कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोरून गावी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. वाहतूक सेवा बंद असल्याने नागरिक मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या मार्गाने गावी जात आहेत. काल दुधाच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या 15 जणांना ताब्यात घेतले होते. तसेच रूग्णवाहिकेतूनही चोरून प्रवास करणारे प्रवासी आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी सुरूच ठेवली आहे. 40 जण ट्रक आणि टेम्पोमधून लपून प्रवास करत होते. कळंबोली येथे नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
Last Updated : Mar 28, 2020, 4:43 PM IST